आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत क्रांती दिन:फुलवाडी शाळेत पालक मेळावा

पुसद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ फुलवाडी द्वारा संचालित अप्पासाहेब अत्रे विजाभज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन, व मनीराम बापू चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्त शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार, पालक शिक्षक मेळावा, निवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सोबतच युवा प्रबोधनकार पंकज पाल महाराज यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून युवा प्रबोधनकार पंकज पाल महाराज, आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख, फुलवाडी गावच्या सरपंच संगीता जाधव, संस्थेच्या सदस्या वंदना चव्हाण, निर्मला चव्हाण, संस्थेचे सचिव राजेंद्र चव्हाण, मांगीलाल महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शाळेमध्ये आठवी पर्यंत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मार्च एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या त्यांच्या शाळेतून शालांत परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त दहावी व बारावी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्याचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार केला.

यामध्ये हर्षल ब्रम्हा चव्हाण, तन्वी नाईक, शिवानी राठोड,रोहिणी आडे, आदींचा गुणगौरव करण्यात आला. तसेच वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमांमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये शिक्षक व पालक सभेत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर युवा प्रबोधनकार पंकज पाल महाराज यांचे प्रबोधन झाले. त्यांनी आपल्या प्रबोधना मधून अंधश्रद्धा, रूढी,परंपरा यांना फाटा देऊन शिक्षणाचे महत्व सर्व पालकांना पटवून दिले. त्यांनी विज्ञानाची व शिक्षणाची कास हाती धरावी तरच आपली प्रगती होइल असे मत व्यक्त केले. त्यानंतर सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी संस्था व शाळा राबवत असलेल्या सर्व उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चव्हाण यांनी पालक यांची शाळेप्रती जबाबदारी या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक गजानन पाचकोरे तर आभार शाळेचे मुख्याध्यापक अभय सिंग ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ईशान चव्हाण, नामदेव वानखेडे, गजानन कलिंदर, पांडुरंग कल्याणकर, ज्ञानेश्वर चव्हाण, उद्धव खुडे, हिमांशू चव्हाण, वसंत चव्हाण, रमेश चव्‍हाण, कैलास काळे, वैशाली चव्हाण, आकाश देडे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व परिसरातील पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...