आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील एकेकाळी आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित झालेल्या येडशी गावाला बाजारपेठेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गावापासून जवळ असलेली मुख्य बाजारपेठ म्हणजे शेलूबाजार. परंतु, बाजाराला जाताना रस्त्याच्या रखडलेल्या बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
हा रस्ता ४.२० किमींचा असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुर झाला आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ५ जून २०२१ रोजी आमदार लखन मलिक यांच्या हस्ते झाले होते. मध्यंतरी कामाला सुरवात होवून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, रस्त्याचे राहिलेले अर्धवट बांधकाम अजूनही कामाच्या प्रतीक्षेत आहे. रस्ता पूर्ण निकामी झाला असून रस्त्याच्या कडेला तसेच रस्त्याच्या मधोमध मोठेमोठे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता मुख्य बाजारपेठेला जोडला असल्यामुळे येथील नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना रोज ये-जा करावी लागते.
तसेच आरोग्यासंबंधीची अडचणी येतात. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे येथील नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी संबंधित प्रशासनाने रखडलेले काम चालू करावे, अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.