आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्थान:दिंडीत सहभागी होणे म्हणजेच पांडुरंगाचे आलेले बोलावणे होय : एपीआय मोरे

पिंपळगाव रेणुकाई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस सहायक निरीक्षक अभिजित मोरे यांचे प्रतिपादन, पिंपळगावातून दिंडी रवाना

जिवनात आल्यानंतर प्रत्येकाने एकदा तरी वारकरी होऊन विठुरायाच्या दिंडीचा लाभ घेतला पाहिजे.शिवाय पांडुरंगाचे बोलावणे आले तर प्रत्येकाला न टाळता पाडुंरगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारीला जावेच लागत असल्याचे प्रतिपादन भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका कार्यक्रमात पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अभीजीत मोरे यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पिंपळगाव रेणुकाई येथुन ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांच्या नेतृत्वाखाली राजुरेश्वर प्रासदायीक दिंडींचे प्रस्थान रेणुकामातेचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे झाले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ तसेच भावीक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.या निमित्ताने स.पो.नी. अभिजीत मोरे बोलत होते. पुढे बोलताना मोरे यांनी सांगितले की, आज जगभरातील वारकरी हे एकच व्यासपीट असे आहे. की त्या ठिकाणी मुलांना चांगले संस्कार आणखी शिक्षण मिळू शकते. यासाठी मुलांना कमीत कमी योग्य वयात योग्य वळण आणि संस्कार मिळण्यासाठी लहान वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत साप्रंदायीक शिबीरात पाठविण्याचे आवाहन देखील मोरे यांनी यावेळी उपस्थितींना केले. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आज विश्वाला चालविणारा देखील कुणी आहे.त्यामुळेच आपण मोकळा श्वास घेऊन जगु लागलो आहे.

पाडुंरगाच्या नावात एवढी ताकद आहे की त्या ताकदीसमोर विश्वातील कुठलीही ताकद नगण्य आहे. यासाठी आपण वेळ भेटेल तेव्हा पांडुरंगाचा देखील जपनाम करायला हवा. आणि जिवनात आल्यानंतर एकदा तरी वारकरी म्हणून दिंडीत गेले पाहीजे याच्या शिवाय दुसरा आंनद आणि परमार्थ असु शकत नाही. मला देखील बंदोबस्ताच्या निमित्ताने पाडुंरगाचे बोलावणे आले तर मी देखील दिंडीला जाऊ शकतो असे देखील अभिजीत मोरे यांनी यावेळी बोलावून दाखवीले.

कोरोनामुळे दोन वर्षांनंतर भाविकांना वारीचा योग : मागील दोन वर्षात कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने सगळीकडेच शासनाने कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या वारकरी सप्रदायाच्या आनंदावर विरजन पडलेले होते. पंरतु आता तब्बल दोन वर्षानंतर शासन निर्बंध शिथील करण्यात आल्याने सर्व सुरळीत सुरू आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहाने पिंपळगाव रेणुकाई येथुन पंढरपूर ३०० वारकरी रवाना झाले आहे. देहु ते पंढरपूर असा हा पायी प्रवास असणार आहे. मागील अकरा वर्षापासून ही पायी वारी सुरू आहे. पांडुरंगाचा काला घेऊनच सर्व भावीक घराकडे रवाना होणार असल्याची माहीती दिंडी प्रमुख ह.भ.प.विष्णू महाराज सास्ते यांनी दिली.

आनंदाला उधान आले : मागील बावीस वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करतो.पंरतु मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे विठुरायाच्या दर्शनाला पायी वारीला जाता आले नाही.त्यांची खंत कायम मनात राहील.यंदा माञ मोठ्या उत्साहाने पंढरपूला पाडुंरगांच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ होती.ती ओढ पूर्ण करण्यासाठी दिंडीत रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.आता केव्हा पंढरपूर जाता आणि केव्हा दर्शन घेतो अशी अवस्था आहे.हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही असे शिवाजी काकडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...