आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उचलबांगडी:पाटण महिला ठाणेदाराची तडकाफडकी उचलबांगडी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध धंद्याला एनओसी देण्यासंदर्भात पाटणच्या महिला ठाणेदाराची एक ऑडिओ क्लिप काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या व्हायरल ऑडिओ क्लीपमूळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अश्यातच गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी त्या महिला ठाणेदारची तडकाफडकी उचलबांगडी केली. ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणामुळे उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. तर बाभुळगाव पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची पाटण ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्याने रूजू झालेले पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी जिल्ह्याचे सुत्र हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाही, अशी तंबी सर्व ठाणेदारांना दिली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत देखील तश्या सूचना दिल्या. मात्र जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी छुप्या पध्दतीने अवैध धंदे सुरू असून त्या धंद्यावर स्थानिक पोलिसांसह एलसीबीकडून कारवायांचा सपाटा लावण्यात येत आहे. अश्याच काही दिवसापूर्वी पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका धंदेवाल्याला एनओसी देण्याबाबत आश्वासन देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामूळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलिस वर्तुळात विविध चर्चेला उधान आले होते. त्यानंतर गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी त्या महिला ठाणेदारची तडकाफडकी उचलबांगडी केली. ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उचलबांगडी केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...