आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागांव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर गौण खनिज प्रकरणात अन्यायकारक कार्यवाही करून निलंबन करण्यात आले आहे. हे निलंबन बिनशर्त मागे घेण्याच्या मागणीसाठी गुरूवार, दि. ९ मार्च रोजी आझाद मैदान येथे विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघाने एक दिवशीय धरणे आंदोलन केले.
जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुल सावंगी येथील तलाठी आय. बी. चव्हाण व टेंभी येथील तलाठी डी. बी. चव्हाण तसेच येथील मंडळ अधिकारी कांबळे यांनी गौण खनिज प्रकरणातील नियमानुसार कार्यवाही करून कार्यवाही करून सदर अहवाल व माहिती संबंधीत तहसिल कार्यालयास सादर केली. सदर गौण खनिज चा लिलाव झालेला असून लिलावाचे रक्कम सुध्दा भरण्यात आलेली आहे.
फक्त पावती अभावी रेती साठा जागेवर पडून होता. या बाबतचा अहवाल देखील संबंधीत तहसीलदार यांना सादर केलेला आहे. सदर दोन्ही तलाठयावरील व मंडळ अधिकारी यांचेवरील निलंबन बिनशर्त मागे घेण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. . एकदिवशीय धरणे आंदोलनात जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजू मानकर, सचिव भरत पिसे, उपाध्यक्ष संजय मारकंड, सहसचिव श्रीकांत तलवारे, कोषाध्यक्ष परिमल डोळसकर यासह सर्व उपविभागाचे पदाधिकारी, विदर्भ मंडळ अधिकारी, पदाधिकारी, मंडळ अधिकारी तसेच जिल्हयातील सर्व तलाठी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.