आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:स्मशानभुमीमध्ये पेवर ब्लॉक बसवले‎

पुसद‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद पंचायत समिती अधिनस्त‎ असलेल्या श्रीरामपूर येथे लोकार्पण‎ सोहळा कार्यक्रमाचे नुकतेच‎ आयोजन करण्यात आले‎ होते.शासनाने स्मशानभूमी विकास‎ मोहीम हाती घेत‎ स्मशानभूमीत,लाइटिंग, पाण्याची‎ व्यवस्था,वॉल कंपाऊंड‎ स्मशानभूमीत जाण्यासाठी सिमेंटचा‎ रस्ता, अशा सर्व सुविधा पुरविल्या‎ जातात. या विकास कामासाठी‎ पंचायत समिती सदस्य, जिल्हा‎ परिषद सदस्य यांच्या विकास‎ निधीतून ती कामे केली गेली.‎

‎श्रीरामपूर पुसद पंचायत‎ समितीमध्ये सध्या सर्वात मोठी‎ ग्रामपंचायत आहे.त्या ठिकाणी‎ स्मशानभूमीत येणाऱ्यांना घाणीतच‎ उभे राहून अंत्यविधी पार पाडावा‎ लागायचा.‎ त्याबाबत नागरिकांनी पंचायत‎ समिती सदस्य रंजना भेलके‎ यांचेकडे पेवर ब्लॉक बसवण्याची‎ मागणी केली होती. त्यानुसार भेलके‎ यांनी पाठ पुरावा करून पंचायत‎ समिती अंतर्गत पंधरावा वित्त‎ आयोग निधीतून मौजा श्रीरामपूर‎ येथे मशानभूमीमध्ये दोन लाख ४३‎ हजार १७१ रुपयाची पेवर ब्लॉक‎ बसून नागरिकांना सुविधा उपलब्ध‎ करून दिली आहे. याबद्दल भेलके‎ यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत‎ आहे.

पेवर ब्लॉक उपलब्ध झाल्याने‎ त्याचा लोकार्पण सोहळ्यात माजी‎ सरपंच मिलिंद उदेपूरकर व माजी‎ उपसरपंच राजू डहाके , सुधाकर‎ सिंगनजुड़े , विजय भेलके,सोनू‎ कहार , विजय भेलके, नरेश हूडेकर‎ , हरगोविंद कदम, प्रसाद रणखांब,‎ सिद्धार्थ सांगडे यांची उपस्थिती‎ होती.‎

बातम्या आणखी आहेत...