आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजना:घरकुल योजनेचे हप्ते वेळेत‎ द्या : मंगल चक्रे यांची मागणी‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे हप्ते‎ वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त‎ झाले आहे. तेव्हा घरकुलाचे हप्ते वेळेत‎ द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात‎ येईल, असा इशारा युवा स्वाभिमान पक्षाचे‎ जिल्हाध्यक्ष मंगल चक्रे यांनी नगर पालिका‎ मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांना लेखी‎ निवेदनातून दिला आहे.‎ दिग्रस शहरातील अनेक घरकुल‎ लाभार्थ्यांना गेल्या २ महिन्यापासून खड्ड्यांचे‎ फोटो दिले.

परंतु पहिला हप्त्याचा लाभ‎ आत्तापर्यंत मिळाला नाही. आणि प्रधानमंत्री‎ घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी जोत्याचे‎ काम पूर्ण केले कुणाचे लेंटल पर्यंत‎ पोहोचले परंतु त्यांना पहिल्या हप्त्यासाठी‎ नगर पालिका येथे वारंवार हेलपाटे घ्यावे‎ लागत आहे. तेव्हा घरकुल आवास‎ योजनेचे हप्ते वेळेत दया अन्यथा तीव्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा‎ युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष‎ मंगल चक्रे यांनी नगर पालिकेला‎ निवेदनातून दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...