आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरीचा गोरख धंदा तेजीत सुरू‎:शंभर रुपये द्या, चोरीच्या दुचाकींवर‎ कोणताही बनावट नंबर टाकून घ्या‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका शहरातून चोरी केलेली दुचाकी‎ दुसऱ्या एखाद्या शहरामध्ये बनावट‎ क्रमांक टाकुन राजरोसपणे फिरवता‎ येते. विशेष म्हणजे कुठल्याही‎ कागदपत्रांची तपासणी न करता‎ अवघ्या १०० रुपयांमध्ये दुचाकीवर‎ नंबर टाकुन मिळतो. हीच बाब हेरून‎ दुचाकी चोरट्यांनी दुचाकी चोरीचा‎ गोरख धंदा तेजीत सुरू केला असुन‎ दुचाकी चोरट्यांचे रॅकेटच जिल्ह्यात‎ सक्रीय झाले आहे. असे असतानाही‎ या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात‎ मात्र पोलिस प्रशासनाला यश आलेले‎ नाही.‎ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये‎ वाढ झाली आहे. दुचाकी चोरीच्या‎ दररोज घडणाऱ्या घटनांवरून दुचाकी‎ चोरट्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे‎ दिसून येते. जिल्ह्यातील काही पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने दुचाकी‎ चोरीच्या घटना घडत आहे.

अनेकदा‎ पोलिसांकडून शोधच लागत नाही,‎ म्हणून नावापुरत्या तक्रारी केल्या‎ जातात. पोलिसही त्यात गुन्हा दाखल‎ करीत नाही. गुन्हा दाखल होत‎ नसल्याने पोलिस तपासात गांभीर्य‎ दाखवत नाही. त्यामुळे दुचाकी‎ चोरट्यांचे फावत असून खुलेआम‎ दुचाकी चोरीचा धंदा सुरू आहे.‎ दुचाकी चोरल्यानंतर त्या दुचाकींचे‎ नंबर मिटवण्यात येतात. बनावट नंबर‎ प्लेट लावण्यात येते. ही नंबर प्लेट‎ सहजासहजी कुणालाही तयार करून‎ मिळते. १०० रुपयांमध्ये वाहनांवर नंबर‎ टाकून दिल्या जातो. त्यासाठी‎ कोणत्याही कागदपत्रांची तपासणी होत नाही.

काही प्रमाणात‎ एलसीबीला यश‎
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना‎ दिवसेंदिवस घडतच आहे. या दुचाकी‎ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी‎ स्थानिक पोलिसांसह एलसीबी पथकाने‎ मध्यंतरी कंबर कसली होती. त्यानंतर‎ काही प्रमाणात चोरीच्या दुचाकी जप्त‎ करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात‎ आल्या होता. त्यानंतर मात्र पुन्हा‎ चोरट्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या जिल्ह्यात‎ सक्रिय झाल्या आहे.‎

छडा लावण्यात अपयश‎
गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाचा विस्तार‎ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शहरात‎ वाहनांची रेलचेल वाढली आहे. शहरासह‎ तालुक्यात वाहनांची गर्दी वाढली असताना‎ चोरट्यांनी दुचाकी चोरीवर लक्ष्य केले आहे.‎ त्यामुळे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना‎ वाहन चोरीचा छडा लावण्यात अपयश आले‎ आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई करत‎ दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे‎ आहे. दुचाकी गाड्या चोरीला जाण्याचे वाढते‎ प्रमाण पाहता दुचाकीस्वार आता धास्तावले‎ आहे.‎

वाहनांची सुरक्षा‎ धोक्यात‎
सध्या दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला‎ आहे. चोरीला गेलेल्या दुचाकी परत‎ मिळण्याचा आशा धूसर झाल्या आहे.‎ त्यातील काही बेवारस स्वरुपात आढळून‎ आल्या आहे. दुचाकी चोरीचे सत्र‎ वाढल्याने वाहनांची सुरक्षा धोक्यात‎ आली आहे. दुचाकी चोरीचा छडा‎ लावण्यात पोलिसांची टीम अपयशी‎ ठरली आहे.‎

घरासमोरून ही दुचाकी लंपास‎
आठवडी बाजारच्या दिवशी बाजारपेठेत गर्दी असते.‎ त्यादिवशी बाजार तसेच शासकीय कामानिमित्त‎ ग्रामीण भागातीलही नागरिक शहरात येतात. त्यामुळे‎ मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचाच फायदा हे‎ दुचाकी चोर घेत आहे. भरदिवसा दुचाकी चोरी होत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...