आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला; पिकाचे नुकसान

देऊळगावराजा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात आज गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा व जालना जिल्ह्याच्या सिमेवर असलेला पाझर तलाव फुटला आहे. त्यामुळे नाल्या काठी असलेल्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेत जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनात वाढ व्हावी, या साठी गिरोली व भिवगावच्या मधोमध पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या पाझर तलावावर अनेक शेतकऱ्यांची मदार होती.दरम्यान, आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला आहे. या तलावातील पाणी शेतात घुसल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेत जमीन खरडून गेली आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे उभी पिके जमिनीवर झोपली आहेत. तलावात पाणीसाठा वाढल्याने व सांडव्यात अडथळा निर्माण झाल्याने या तलावाची भिंत फुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाझर तलाव फुटल्यामुळे तालुक्यातील निमखेड, गिरोली या गाव शिवारातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...