आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटाकुटीस‎:लम्पीच्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीस‎

मानोरा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सरकारी दवाखाने मग ते‎ माणसांची असो की गुरांचे कर्मचारी संख्या‎ पुरेशी नसल्याने विपरीत परिस्थितीचा सामना‎ मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना करावा‎ लागत आहे.‎ कोरोना ह्या महामारीच्या आपत्कालीन‎ परिस्थितीमध्ये सुद्धा तालुक्यातील‎ नागरिकांच्या आरोग्याची मोठी हेळसांड‎ झाली. या विदारक आणि जीवघेण्या‎ अनुभवावरून मानोरा तालुक्यात असलेल्या‎ ग्रामीण रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि‎ गुरांच्या सगळ्या दवाखान्यांमध्ये आवश्यक‎ ती कर्मचाऱ्यांची संख्या उपलब्ध करून दिली‎ जाईल या नागरिकांच्या आशा सध्या सुरू‎ असलेल्या गुरांवरील लंपी या आजाराने फोल‎ ठरविली आहे.

तालुक्यातील सगळी गावे,‎ तांडे, पाढे येथे येथील शेतकरी आणि इतरही‎ नागरिक आपल्याकडे गाई, बैल, म्हशी,‎ शेळ्या मोठ्या प्रमाणात बाळगून आहेत.‎ तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकरी‎ आणि पशुपालक मागील काही महीण्यांपासून‎ गुरांवरील लंपी ह्या आजाराने मेटाकुटीस‎ आलेले आहेत. गाय बैल आणि म्हशीच्या‎ सर्वांना मोठ्या प्रमाणात पुढे उठून मोठ्या‎ जखमा ह्या पाळीव प्राण्यांना होत असल्याने‎ आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील‎ सुविधा अत्यंत तोकडी असल्याने शेतकऱ्यांना‎ आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...