आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंदुरजनाघाट:बालवैज्ञानिक विक्की बिनझाडे याच्या‎ प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड‎

बेनोडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आय. एस. ओ‎ नामांकन प्राप्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य‎ विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची‎ शासकीय निवासी शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी‎ विक्की बिनझाडे याची वैज्ञानिक प्रतिकृती इनोव्हेटिव्ह‎ टीचिंग एड्सची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान‎ प्रदर्शनीसाठी झाली आहे. जुना धामणगाव रेल्वे येथील‎ डॉ. एम. के. पवार पब्लिक स्कूलमध्ये ही प्रदश्रनी पार‎ पडली.

विक्कीने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल‎ शाळेचे मुख्याध्यापक अतुल बोरे, अधीक्षक प्रवीण‎ इंगळे, शिक्षक प्रवीण बाळस्कर, नितीन खटाळे, अशोक‎ पजई, अंकिता फरकाडे, पंकज मांडले, निलेश कुरवाडे,‎ निलेश ईखे, दिनेश नारिंगे, संजय बोहे तसेच बाह्यस्त्रोत‎ कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शिक्षिका प्रमोदिनी राऊत व त्याचे‎ अभिनंदनक करत शुभेच्छा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...