आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:वीज चोरीप्रकरणी दंड भरला‎ नाही; पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अखेर गुन्हा‎

यावल‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

\तालुक्यातील बामणोद येथे तीन‎ जणांना वीज चोरी करताना राज्य‎ वीज महावितरण कंपनीच्या पथकाने‎ पकडले होते. वीज चोरी केली‎ यासाठी त्यांना तडजोड अंती दंड‎ आकारण्यात आला होता. मात्र‎ त्यांनी दंडाची रक्कम न भरल्याने‎ अखेर या तिघांविरुद्ध येथील‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎ या प्रकरणी राज्य वीज‎ महावितरण कंपनीचे बामणोद‎ येथील अभियंता देवेंद्र सुधाकर‎ भंगाळे यांनी यावल पोलिस ठाण्यात‎ तिघांविरुद्ध फिर्याद दिली.

त्यानुसार‎ त्यांनी स्वत: बामणोद येथील‎ रहिवासी रमेश मिठाराम सोनवणे,‎ चिंतामण माधव सोनवणे व विलास‎ सुपडू सोनवणे या तीन जणांकडे‎ वीज चोरी केल्या प्रकरणी कारवाई‎ केली होती. अाणि त्या तिघांना‎ प्रत्येकी दोन हजार रुपये दंड‎ आकारून ताे दंड तत्काळ‎ भरण्याच्या सूचना केल्या होत्या.‎ मात्र या तिघांनी दंडाची रक्कम‎ भरलीच नाही. त्यामुळे अखेर दंड‎ अदा न केल्याने अभियंता भंगाळे‎ यांनी फिर्याद दिली.‎

बातम्या आणखी आहेत...