आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईदची नमाज:आर्णीच्या ईदगाह मैदानावर अदा केली रमजान ईदची नमाज; पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिल्या आर्णीकरांना शुभेच्छा

आर्णी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे (उपवास) पूर्ण केल्यानंतर रमजान ईद सामूहिकपणे मंगळवारी आर्णी शहरातील ईदगाह मैदानावर साजरी करण्यात आली. जिल्हा दौऱ्यावर आलेले पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दर्गाला भेट दिली असता तेथे त्यांनी सर्व मुस्लिम बांधवाना गुलाबाचे फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शहरातील जामा मज्जीद चौक, शास्त्री नगर, मुबारक नगर तसेच शहरातील सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन बाबा कंबल्पोष दर्गा येथे असलेल्या ईदगाह मैदानावर सामूहिक ईद-उल-फितर ची नमाज अदा केली. दरम्यान मौलाना हसन रीझवी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले.

दोन वर्षाच्या दीर्घकाळानंतर नमाज अदा करण्यात आली असून, त्यात अनेक बांधव उत्साह वाटत होते. नमाज अदा केल्या नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक पीतांबर जाधव यांनी आपल्या ताफ्यासह बंदोबस्त लावला होता. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...