आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून गळफास घेऊन संपविले आयुष्‍य

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षेच्या तणावातून २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील गिरिजानगरात रविवारी (१५ मे) सायंकाळी ७.३० च्या सुमारास उघडकीस आली. ओम पुरुषोत्तम श्रीपत्तीवार (२१, रा. दुर्गामाता वॉर्ड, घाटंजी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांना ओमच्या खाेलीत एक खर्ड (पॅड) आढळून आले असून त्यात ‘पेपर टेन्शन’ असा उल्लेख करण्यात आला होता. काही दिवसांपासून ओमची परीक्षा सुरू असून त्याच तणावात त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.

पोलिस सूत्रांनुसार, घाटंजी शहरातील दुर्गामाता वाॅर्डात राहणारा ओम श्रीपत्तीवार हा यवतमाळ शहरातील वाधवानी फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. गिरिजानगरात नरेश कळबे यांच्याकडे ताे तीन मित्रांसह भाड्याने खाेली करून राहत होता. ओमचा मित्र शुभम कांबळे व चंद्रशेखर वाघमोडे दोघेही सुट्या असल्यामुळे १२ मे रोजी नांदेडला गावी गेले होते, तर शशांक वैश्य हा १५ मे रोजी घाटंजीतील घरी गेला होता. त्यामुळे खाेलीत ओम एकटाच होता.

बातम्या आणखी आहेत...