आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वृक्षांचे रोपण

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळया प्रजातीच्या ७५ वृक्ष रोपांची लागवड करून महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी पार्लावार, प्रा. अंजली गहरवार, प्रा. धीरज वसुले, रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. रवींद्र सातभाई, मंगेश शेटे, सहायक कुलसचिव, डॉ. प्रशांत शिंगोटे आणि संदेश बांगर आदी उपस्थित होते.

डॉ. पार्लावार यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याचे हेतुने विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा व विद्यार्थ्यांना वृक्षलागवड करून संगोपना करिता निर्देशित केले. एक झाड लावायचे आणि त्याची चार वर्ष जोपासना करूनच पदवी घ्यायची, असा संकल्प करून हा उपक्रम राबवण्यात आला. त्यासबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन या करिता विद्यार्थ्याकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाविद्यालय परिसरात लागवड केलेल्या वृक्षांमध्ये करवंद, सीताफळ, पेरू, आंबा या वृक्ष प्रजातींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात लागवड केलेली झाडे जगवणे व संरक्षण करण्याची शपथ घेतली.कार्यक्रम यशस्वितेसाठी रूपेश राऊत. प्रा. हेमंत वाघ, डॉ. रोशन शिंदे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. प्रतिक पुसदकर, डॉ. पि. के. प्रधान, एकनाथ भंकाळे, पंकज जैन, अस्मिता पाटील, दीपाली शिंदे, मंगला पिंगळे, बंडू भालेकर व शुभम धार्मिक आदी कर्मचारी यांनी देखील सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...