आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण ; मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था मार्फत आयोजित जागतिक पर्यावरण दिन वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..!एक पाऊल वसुंधरेसाठी पुसद शहर व गौळ परिसरा मध्ये पर्यावरण दिना निमित्त मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. वडाचे झाडे, पिंपळाचे झाडे, चींचाचे झाडे, आंब्याचे झाडे, साग, कऊट,लिंबाचे,इत्तर अनेक प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत.संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनी लोकांमध्ये पर्यावरणा विषयी जनजागृती केली. ते म्हणाले की, झाडाची किंमत एक सामान्य झाड एका वर्षात २० किलो धुळ शोषून घेते. ते दरवर्षी सुमारे सातशे किलो ऑक्सिजन उत्सर्जित करते. दरवर्षी २० टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. उन्हाळ्यात मोठ्या झाडाखाली सरासरी तापमान चार अंशांनी कमी राहते. पारा लिथियम,शिसे, इत्यादी विषारी धातूंचे आठशे किलो मिश्रण शोषून घेण्याची क्षमता. दरवर्षी सुमारे एक दशलक्ष चौरस मीटर प्रदूषित हवा शुद्ध करते. घराजवळ चे झाड ध्वनिक भिंत म्हणून काम करते. म्हणजेच आवाज,ध्वनी शोषून घेतो. तसेच तापमान वाढ, वृक्षतोड, प्रदूषण, अशा समस्यांनी पर्यावरण संतुलन टिकवणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे. हे संसाधन दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण सतत वाढत चाललेली लोकसंख्या, त्यामुळे वाढत चाललेले औद्योगिकीकरण आणि त्यात मानवी जीवन सुखमय व्हावे यासाठीचे प्रयोग दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यात मानवी प्रजाती चेही अस्तित्व धोक्यात आले आहे. यासाठी आपण पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि त्याच्या विविध घटकांची माहिती घेणे गरजेचे आहे. यावेळी राजकुमार भगत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पी. जी. धुळे, उपसरपंच चंद्रकांत हाराळ, पंडित आडतकर, रमेश हाराळ, पवन मस्के, सचिन हाराळ, रमेश चव्हाण, रमेश पवार, नीकेश गाडगे, राजवीर जाधव, लहू चव्हाण, रमेश राठोड, प्रमोद टाकरस, अविनाश चव्हाण, अजय भगत, रणजित राठोड या सर्वांनी जागतिक पर्यावरण दिना निमित्त कार्यक्रमात भाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...