आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आठवडी बाजाराला लागुन जिल्हा परिषदेची बेसिक उच्च माध्यमिक शाळा आहे. सदर शाळेत जाण्याच्या रस्त्यावर नगरपंचायत प्रशासनाने मुरूम सोडून काळी माती टाकल्याने शाळकरी मुलांची घसरगुंडी होत असल्याचे दिसते तर आठवडी बाजार जाणाऱ्या रस्त्यावर सुध्दा काळी माती व चुरी टाकून ठेवल्याने नागरिक व दुकानदार नगरपंचायतला शिव्यांची लाखोली वहात आहे.
शहरातील समस्यां संदर्भात प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेवक रूपेश राऊत यांनी यापूर्वी मासिक सभेमध्ये मान्सून पूर्व नियोजन करण्यासंबंधी सुचना केली होती. तरीही त्या समस्यांचे कुठलेही नियोजन नगरपंचायत प्रशासनाने आजपावेतो केले नाही. मंदिराच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाइप लाईन गेल्या १५ ते २० दिवसापासून फुटलेली असल्याने दुर्गंधी युक्त पाणी सभोवती पसरले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र दुषित पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. गावात फिरत असलेले मोकाट जनावरे, कुत्रे मोकाट फिरत असुन जनावरांना तोडत आहेत. सभागृहात सुचना देऊनही कुठलीच सुधारणा केली नसल्याने वरील समस्ये संदर्भात दि. ११ जुलै २०२२ रोजी नगरसेवक रूपेश राऊत यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. नगरसेवकाला जर शहरातील किरकोळ लोकोपयोगी कामे करण्यासाठी निवेदन द्यावे लागत असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय? . नागरिक रस्त्यांवर उतरणार असा इशारा रूपेश राऊत यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.