आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहित संघटनेची मागणी:पी.एम. किसान केवायसीची मुदत वाढवा; तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तांत्रिक अडचणीमुळे केवायसीची नवीन नोंदणी झाली नसल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजने पासून वंचित राहू नये. यामुळे प्रशासनाने केवायसी नोंदणीची मुदत वाढ करावी. या मागणीचे निवेदन जनहित कल्याण संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेची केवायसी नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट परंत जाहीर करण्यात आली. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे मोबाईल अॅपवर शेतकऱ्यांचे केवायची नोंदणी झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव पंतप्रधान किसान सन्मान योजने पासुन वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पूर्वीच तालुक्यातील शेतकरी बांधव अतिवृष्टी मुळे नुकसानीच्या संकटात सापडला असतांना त्यातच तांत्रिक अडचणी मूळे केवायसी नोंदणी झाली नसल्याने पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून वंचित राहु नये या हेतूने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली येथील जनहित कल्याण संघटनेच्या वतीने केवायसीची मुदत वाढ करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे संस्थापक गौरीशंकर खुराणा, रवी पोटे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, अनिल गेडाम, विजय आसेकर, धीरज डांगाले, सचिन देवाळकर, प्रफुल्ल उरकुडे, अतुल वटे, गौरव आसेकर, सुरज कोल्हे आदी उपस्थित होते. दरम्यान,तालुक्यात हजारो हेक्टरवरील पीक पुरात उध्वस्त झाले. शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी अनेक समस्यांचे डोंगर उभे झाले असून त्यांना भरीव मदतीची गरज आहे.जून महिन्यात शेतकऱ्यांनी दोन दा पेरणी केली परंतु पावसाने दगा दिला त्यानंतर पुन्हा तिबार पेरणी केली परंतु जोरदार पुरामुळे जमीन खरडून पेरलेले पूर्ण वाहून गेले तर शेतात ठेऊन असलेले खतही वाहून गेले.

बातम्या आणखी आहेत...