आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:लग्नाच्या जेवणातून 180 वऱ्हाड्यांना विषबाधा ; आरोग्य केंद्रात तर काहींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह सोहळ्यात आलेल्या ४०० वऱ्हाडांपैकी तब्बल १८० वऱ्हाडींना लग्नाच्या जेवणामधून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. ६ जूनला रात्री उघडकीस आली आहे. इसापूर येथील घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली असून लग्नात आलेल्या लहान लहान मुलांना देखील जेवणामुळे विषबाधा झाली होती.विषबाधित वऱ्हाड्यांना लग्न सोहळा सोडून तातडीने शेंबाळपिंपरी येथील खासगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल केले होते. तर काहींना पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान दुसऱ्या दिवशी मंगळवारी विष बाधित वऱ्हाड्यांना उपचार करून सुट्टी देखील देण्यात आली आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथे एका विशिष्ट समाजाचा विवाह सोहळा दि. ६ जूनला दुपारी १ वाजताच्या सुमारास पार पडला. लग्न विधी आटोपल्यानंतर बिर्याणी वर लग्नात आलेल्या वऱ्हाड्यांनी ताव मारणे सुरु केले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही तासांतच दोन ते चार वऱ्हाड्यांना उलटी मळमळ सुरू झाल्या. त्यानंतर लगेच इतर वऱ्हाड्यांनाही उलट्या सुरू झाल्याने लग्न सोडून धावपळ करण्याची वेळ आली. धक्कादायक बाब म्हणजे, यात लहान मुलांनाही विष बाधा झाली होती. वऱ्हाड्यांना तातडीने शेंबाळपिंप्री येथील खासगी व प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर काहींना पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दाखल वऱ्हाड्यांना आ. इंद्रनील नाईक यांनी भेट देऊन विचारपूस केली‌.

भुकेने व्याकूळ झालेल्या वऱ्हाड्यांना बिर्याणी पडली महागात इसापूर धरण येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास विवाह समारंभ होता. मोठ्या थाटामाटात नवरदेव आपल्या वऱ्हाडासह दुपारी दाखल झाला. विवाह सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता लग्न समारंभासाठी उपाशी पोटी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी बिर्याणी वर ताव मारला. दोन तासानंतर अचानक काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. एक दोन जणांना आधी त्रास जाणवला. त्यानंतर एका मागे एक उलट्या होणाऱ्या वऱ्हाड्यांच्या संख्येत वाढत होत गेली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीना तातडीने शेंबाळपिंपरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कशामुळे झाली विषबाधा याचा तपास सुरू वऱ्हाड्यांची संख्या लक्षात घेता शेंबाळपिंपरी येथील एका खासगी रूग्णालयासह इतर रुग्णालयात ५० पेक्षा अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. रुग्णाचे प्रमाण वाढल्याने शेंबाळपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिकेतून विष बाधित १८ वऱ्हाड्यांना पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. ६ जूनला रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू केला. नेमकं अन्नातून विष बाधा झाली की कशामुळे विषबाधा झाली याचा तपास केला जात आहे. मंगल कार्यात अचानक घडलेल्या या घटनेमुळे वधू आणि वर मंडळीकडे एकच खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...