आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोटार वाहन कायद्याची पायमल्ली करत वणी ते यवतमाळ रस्त्यावर बिनधास्त धावणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सवर कारवाई करा, या मागणीसाठी नवाज शरीफ कादिर शरीफ हा तरुण मंगळवार, ४ एप्रिल पासून उपोषणाला बसला आहे. याची दखल घेत परिवहन मंडळ, पोलिस विभागाने संयुक्तपणे तीन प्रवाशी ट्रॅव्हल्स जप्त करत कारवाई केली. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ ते वणी मार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. बऱ्याचवेळा आंदोलन, निवेदन दिल्यानंतरही ट्रॅव्हल्स चालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. ही बेकायदा वाहतूक बंद करा, अशी मागणी जोर धरत होती.
अशात ह्या सामाजिक हिताची दखल घेत शहरातील मुस्लिम तरुण नवाज शरीफ हा पवित्र रमजान महिन्यातील रोजा करत मंगळवार, ४ एप्रिल पासून उपोषणाला बसला आहे. या उपोषणस्थळी आमदार बोदकुरवार यांनी भेट देत कार्यवाही करण्याचे आदेश दोन्ही विभागाला दिले होते. उपोषणाची दखल घेत परिवहन विभागाची दोन पथके बुधवार, ५ एप्रिल रोजी वणी भागात गस्तीवर तैनात होती. तर पोलिस विभागही अॅक्शनमोडवर होते. अशातच तीन ट्रॅव्हल्स या भागात येताच दोन्ही विभागाने संयुक्त कार्यवाही करत ट्रॅव्हल्स जप्त करत त्यांच्यावर शासकीय नियम तोडल्याने दंड ठोकला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.