आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर पोलिस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या हेड कॉन्स्टेबलने लोखंडी गजाला लुंगी बांधून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, दि.१७ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृत्यूपूर्वी चक्क दोन पानाची चिठ्ठी हेडकॉन्स्टेबलने लिहून ठेवली आहे. मृत्यूला एसपीच जबाबदार असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. विष्णु सखाराम कोरडे वय ५३ वर्षे रा. लक्ष्मी नगर असे आत्महत्या करणार्या पोलिस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हेड कॉन्स्टेंबल विष्णू कोरडे हे त्यांच्या घराच्या गच्चीवर नियमित व्यायाम करीत होते. अशात शुक्रवार, दि. १७ जून रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उठून गच्चीवर व्यायाम करण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला विष्णू घराच्या गच्चीवरून खाली उतरलेच नाही. त्यानंतर घरच्या मंडळींनी विष्णु कोरडे यांची चौकशी केली असता, त्यांचा मृतदेह गच्चीवर जाणाऱ्या पायरीच्या लोखंडी गजाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह पाहून विष्णू कोरडे यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलींनी आरडाओरड सुरू केली. नातेवाईकांनी तात्काळ घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली. दरम्यान, विष्णू कोरडे यांचा मृतदेह खाली उतरून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल केला होता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येबाबत शहर पोलिस स्टेशनला माहिती मिळताच शहर पोलिसांनी सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय आणि काही पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर आढळून आलेली दोन पानाची चिठ्ठी नातेवाईकांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. यात जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्नीसमोर केलेला अपमान आणि वेळोवेळी दिलेल्या वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.