आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पोलिस मित्र संघटना जिल्हा अध्यक्ष युवकाची आत्महत्या

महागाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सवना येथील धक्कादायक घटना, मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप ठेवले स्टेट्स

पोलिस मित्र संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेल्या एका युवकाने व्हाट्सअप स्टेट्स ठेवून घराजवळील इमारतीला गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना महागाव तालुक्यातील सवना येथे मंगळवार, दि. २६ जुलैला सकाळी उघडकीस आली. अजिंक्य रमेश बेलखेडे वय २४ वर्ष रा. सवना असे मृत युवकाचे नाव असून तो यवतमाळ जिल्हा पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होता.

महागाव तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तो आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांबरोबर बंदोबस्ताकरिता अजिंक्य बेलखेडे उपस्थित रहायचा. अजिंक्य याने मंगळवारी आज सकाळी ३ वाजून २२ मिनिटांनी आपल्या मोबाइलवरील वॉट्सअॅपवर दोन वेगवेगळे स्टेट्स ठेवले होते. त्यात सॉरी हा किती अजब शब्द आहे, माणुस म्हणाला की भांडण संपते, डॉक्टर म्हणाले की माणुस संपतो. आणि निर्णय चुकला म्हणुन माणुस वाईट होत नसतो, कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं असेल, दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजुन घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल असे दोन स्टेट्स ठेवुन घराजवळ असलेल्या सोसायटीच्या इमारतीला गळफास घेवुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरिता पाठविला. अजिंक्य याच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण असुन आत्महत्येचे कारण अद्याप कळु शकले नाही. अजिंक्यच्या अकस्मात जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दिग्रस शहरातील गांधीनगर परिसरातील एका मानसिक रुग्ण असलेल्या तरुणाने आपल्या राहत्या घरीच सिलिंग फॅनला स्क्राप बांधून गळफास घेतल्याची घटना मंगळवार, दि. २६ जुलैला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आदित्य दिलीप खानजोडे वय २१ वर्ष रा. गांधीनगर, दिग्रस असे मृत तरूणाचे नाव आहे. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृत हा मानसिक रुग्ण असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार पांडुरंग फाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक देवानंद कायंदे, विनाश जाधव, शालिक राठोड, संजय गोरे, केशव चव्हाण करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...