आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:पैसे दुप्पट करण्याचे आमिष देणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहणाऱ्या नंदनवार यांना एका कंपनीत पैशांची गुंतवणूक केल्यास दुप्पटीने पैसे मिळत असल्याचे आमिष दाखवणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अरविंद नारायण नंदनवार यांना आरोपीने सांगितले की एका कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पटीने पैसे मिळतात. नंदनवार यांनी २० लाख ४० हजार रुपये रोख रक्कम त्यांना दिली. रक्कम देण्यात आल्यानंतर फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे रामनगर ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण पथकाने तपासाला गती देत नंदनवार यांनी ज्या बँक खात्यात रक्कम वळती केली होती. त्या बँक खात्याची माहिती घेतली असता, मुंबईतील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सतीश मोरे, रणजित सिंग, विकी हंड्रेक्स (रा. नालासोपारा) या तीन जणांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या निर्देशात गुन्हे पथकाचे सपोनि विजय चन्नोर, रामहरी सिरसाट, भारत सातपुते, दिनेश अवथनकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...