आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त:वडगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ;एका महिलेसह १७ जुगारी पोलिसांच्या ताब्यात

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुगार अड्ड‌यावर पोलिसांनी धाड टाकून एका महिलेसह १७ जुगारींना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, दि. ५ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास शहरातील वडगाव परिसरातील पल्लवी लॉन मागील एका घरात करण्यात आली असून जवळपास साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आशिष आत्राम वय २९ वर्ष रा. पल्लवी लॉनमागे, यवतमाळ, हनिफ सत्तार गोरी वय ५० वर्ष रा. छत्रपती सोसायटी उमरसरा, शेख हकीम शेख करीम वय ४० वर्ष रा. ईस्लामपूरा, कळंब, अजय खडसे वय १८ वर्ष रा. पापळ जि. अमरावती, दिलशाह युसूफ खान पठाण वय ३० वर्ष रा. मोठे वडगाव, यवतमाळ, मिलींद मोहोड वय ३२ वर्ष रा. दांडेकर ले-आऊट, विजय मसराम वय ४२ वर्ष रा. उमरसरा, पंकज राऊत वय ३० वर्ष रा. वडगाव, आशिष कुरडकर वय ३५ वर्ष रा. उमरसरा, जसवंत चोटाई वय २४ वर्ष रा. संकटमोचन, अजय राठोड वय ४० वर्ष रा. तुळजा नगरी, श्याम शर्मा वय ४० वर्ष रा. धनश्री नगर, मोठे वडगाव, मोहन टेंभरे वय ३० वर्ष रा. दांडेकर ले-आऊट, उल्हास वैद्य वय ५७ वर्ष रा. अंजनेय सोसायटी, अमित देशमुख वय ३२ वर्ष रा. संभाजी नगर, यवतमाळ, मिना नेमाडे वय ३४ वर्ष रा. देवी नगर, लोहारा आणि प्रतिक वय २५ वर्ष रा. मोठे वडगाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या १७ जुगारींची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील वडगाव परिसरात असलेल्या पल्लवी लॉन मागील पाण्याच्या टाकीजवळ एका घरात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होता. याबाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे यांना मिळाली. त्यावरून सोमवारी रात्री अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या आदेशावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. यावेळी एका महिलेसह तब्बल १७ जण जुगार खेळतांना आढळून आले. या कारवाई पोलिसांनी एक लाख ५२ हजार १४० रूपये रोख, दहा मोबाईल फोन, आणि पाच दुचाकी असा एकूण ४ लाख ३२ हजार १४० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पाडली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे, सफौ बगमारे, गजानन वाटमोडे, समाधान कांबळे, वाढई, पोटपल्लीवार, महिला कर्मचारी प्रिती परचाके, होमगार्ड कल्पना आणि वाहन चालक चरडे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...