आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गावठी दारू अड्ड‌्यावर पोलिसांचे धाडसत्र; लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ तालुक्यातील गावठी दारू अड्ड‌यावर कारवाई करीत ग्रामीण पोलिसांनी लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवार, दि. ८ सप्टेंबरला तालुक्यातील बिसनी टाकळी, बेलोरा आणि भांबराजा परिसरात करण्यात आली. या प्रकरणी प्रफुल्ल भोयर वय ३५ वर्ष, रवी देवकते वय २४ वर्ष, गजानन खरात वय ४२ वर्ष रा. बेलोरा, अश्वीन तिजारे वय २६ वर्ष रा. मार्तंड, किसन रामटेके वय ६० वर्ष रा. भांबराजा आदींवर कारवाई करण्यात आली आहे.

यवतमाळ तालुक्यात भिसनी टाकळी, बेलोरा आणि भांबराजा परिसरात गावठी दारू अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू होते. याबाबतची माहिती ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे यांना मिळाली होती. त्यावरून गुरुवारी पथकाने तिन ठिकाणी वेगवेगळ्या धाडी टाकत एक लाख २८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच जणांवर गुन्हे नोंद केले. ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, कवरासे, पथकातील कैलास लोथे, ज्ञानेश्वर मातकर, कुणाल पोलपील्लेवार, संदिप मेहत्रे, नितीन कोवे, सचिन पातकमवार, गजानन गोडंब, अविनाश वाघाडे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...