आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैद्य शिंदी व पाच हजार रुपये मुद्देमाल जप्त:अवैद्य शिंदी विक्रेत्यांच्या घरावर पोलिसांचा छापा

ढाणकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निंगनूर बिट अंतर्गत येत असलेल्या कृष्णापूर ग्राम येथे अवैद्यशिंदी विक्रेत्यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ५० लिटर अवैद्य शिंदी व पाच हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार, दि. ३ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

विजय रामप्रसाद शुक्ला वय ३२ वर्ष रा. कृष्णापूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या शिंदी विक्रेत्याचे नाव आहे. ही कारवाई ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गजानन खरात, सहायक दत्ता कुसराम, होमगार्ड चंद्रमणी वाढवे यांनी पार पाडली. या प्रकरणी बिटरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...