आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार:शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वडगाव परिसरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर अवधुतवाडी पोलिसांनी धाड टाकून तब्बल २३ जुगारींना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवार, २७ ऑगस्टला रामकृष्ण नगर आणि तुळजाई नगरात करण्यात आली.

कृष्णराव मगर, विशाल कांदकवार, सुनील मेश्राम, प्रदीप पोयाम, प्रविण कांबळे, अक्षय निकम, शाम नैताम, विष्णू काटपल्लेवार, सचिन लंगोटे, अक्षय उईके आणि नितीन मगर सर्व रा. रामकृष्ण नगर, मुलकी तसेच अक्षय राऊत रा. तुळजाई नगरी, त्रिशूल घोंगडे रा. कृष्णकुंज नगर, सागर बयास रा. लक्ष्मी नगर, निखिल पुसे रा. देवी नगर लोहारा, श्रीकांत बोनसरे रा. कोल्हे ले आऊट, राजेश जाहेलवाल रा. साईबाबा नगर, प्रदीप गायकवाड रा. पोलिस मित्र सोसायटी, हरीष बोंडे रा. उज्वल नगर, विकास भोसकर रा. देवीनगर लोहारा, संजय शेंडे रा. दत्तात्रय नगर, सतीश गिरीरा. मंगलमूर्ती नगर आणि प्रविण भवरे रा. देवीनगर लोहारा अशी दोन्ही कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेले २३ जुगारींची नावे आहे.

बातम्या आणखी आहेत...