आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेतस्थळ:पोलिस भरतीचे संकेतस्थळ चालेना, उरले पाच

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलातील शिपाई व चालकांची २१ हजार ७६४ पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्यासाठी सुरू करण्यात आलेले policerecruitment2022.mahait.org हे संकेतस्थळच चालत नसल्याने युवकांचे हाल होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील युवकांना भटकंती करावी लागत आहे. अर्जासाठी ३० नोव्हेंबरची मुदत आहे, अवघे पाच दिवस उरल्याने युवकांची घालमेल होत आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना दररोज शहरातील सायबर कॅफे वर जावे लागते. सकाळपासूनच त्यासाठी युवकांची भटकंती सुरु होते. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा ग्रामीण भागात अद्याप काही ठिकाणी उपलब्ध नाही. तसेच काही ठिकाणी असल्यास अनेक ठिकाणी कित्येक तास वीज नसते. त्यातच शहरात येऊनही सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने गैरसोय वाढली.

बातम्या आणखी आहेत...