आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारदार चाकूचा धाक दाखवत सहा ते सात जणांच्या टोळक्याने ट्रक चालक - क्लिनरला मारहाण करीत २५ टन साखरेसह ट्रक पळवून नेला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चक्क दहा तासातच ट्रकचा शोध घेत तिघांना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील फरार तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके परजिल्ह्यात रवाना करण्यात आली आहे. शशिकांत उर्फ जॅकी, विक्की आणि लतीफ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.
शहरातील जांबरोड परिसरातील ट्रक मालक-चालक योगेश रघुवंशी आणि क्लिनर दुर्गेश दोघेही रविवारी ट्रक क्रमांक एमपी-४८-एच-०७८८ मध्ये मध्य प्रदेशातील शहापूर येथून २५ टन साखरेचा माल घेवून सायंकाळी यवतमाळ येथील पी.के. राजा यांच्याकडे घेवून निघाले होते. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास धामणगाव-यवतमाळ मार्गावर असलेल्या नगर वन जवळील बीडकर फॉर्मजवळ एका चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करीत अचानक कार ट्रकसमोर आडवी लावली. यावेळी चारचाकी वाहनातील सहा ते सात जणांनी क्लिनर दुर्गेश आणि ट्रक चालक-मालक असलेला योगेश या दोघांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर दोघांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल हिसकावत ट्रक घेवून पळ काढला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.