आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांना साद:पदवीधर नोंदणीसाठी आता राजकीय पक्षांना साद

यवतमाळ5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षांत होणाऱ्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात मतदार नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे निवडणूक विभागाने नव्याने नोंदणीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २० हजार २०९ मतदारांनी नोंदणी केली असून, ती वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले.

मागिल महिन्यापासून सुरू झालेल्या पदवीधर नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. अनेक पदवीधरांनी नोंदणी करण्यास उत्सुकता दाखवलीच नाही. परिणामी, नोंदणीचा आकडा पार घसरला होता.

मागिल निवडणुकीत जिल्ह्यात ३२ हजार ९९९ मतदारांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा ५० टक्केही नोंदणी झाली नव्हती. जवळपास १५ हजारांवर नोंदणीला ब्रेक लागला होता. शेवटी प्रशासनाने नोंदणीसाठी पावले उचलले होते.

इतर निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार नोंदणी
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन नव्या मतदारांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. यात मतदार नोंदणीत वाढ होईल, अशी शक्यता आहे. मात्र, एकट्या प्रशासनाच्या माध्यमातून नोंदणी करताना अडचणी निर्माण होत आहे.

पदवीधरांसह नवीन मतदारांनी नोंदणी करावी
जिल्ह्यात पदवीधरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पदवीधरांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दाखविला नाही. मतदारांची संख्या वाढावी यासाठी निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. पदवीधर नोंदणीचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे. त्याचप्रमाणे नियमित मतदारांची नोंदणी केली जाणार असून, नवीन मतदार तसेच पदवीधरांनी नाव नोंदणी करुन घ्यावी.स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक.

बातम्या आणखी आहेत...