आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळी:रेती तस्करीने घेतला गरीब शेतकऱ्याचा बळी; टिप्परच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार​​​​​​​

उमरखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने सायकलस्वारास धडक देवून ट्रकखाली चिरडून ठार केल्याची घटना गुरूवार, दि. १२ मे रोजी दुपारी १ वाजता दरम्यान विडूळ गावाजवळील कॅनॉल रस्त्यावर घडली. मुकिंदा लक्ष्‍मण मुनेश्वर वय ५५ वर्ष, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील देवरी ते विडूळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचे टिप्पर भरधाव वेगाने चालतात. अशात गुरूवार, दि. १२ मे रोजी दुपारच्या सुमारास विडूळ येथील शेतकरी मुकिंदा लक्ष्‍मण मुनेश्वर शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे येत होते. त्यावेळी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पुलाजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांना धडक दिली. यात ते टिप्परच्या मागच्या चाकामध्ये आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गावापासून अगदी दोनशे ते तीनशे मीटरवर ही घटना घडली. त्यामुळे काही क्षणातच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला, परंतू धडक दिल्याबरोबर संबंधित चालकाने टिप्पर घटनास्थळी सोडून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत देशमुख फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...