आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरणोपरांत देहदान‎:राष्ट्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक‎ प्रभाकर नालमवार यांचे मरणोपरांत देहदान‎

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस येथील राष्ट्रीय विद्यालयाचे‎ सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर नाना नालमवार वय ८१ वर्ष‎ यांचे शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०‎ वाजताच्या सुमारास आर्णी येथील त्यांचे मोठे जावाई‎ प्रशांत लिगांवार यांच्याकडे वृद्धापकाळाने निधन झाले.‎ त्यांनी मृत्यु पश्चात देहदान करण्याचा संकल्प १०‎ वर्षाआधी केला होता. याकरीता त्यांनी देहदान समितीच्या‎ जिल्हाध्यक्षा समिना खालीक शेख यांच्याकडे रीतसर‎ अर्ज भरुन दिला होता.

त्यांच्या मृत्यु पश्चात शनिवारी‎ सायंकाळी ६ वाजता आर्णी येथे शोकसभा घेण्यात‎ आली. त्यांचा देह वसंतराव नाईक वैद्यकीय‎ महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या‎ विद्यार्थांना शिकता व संशोधन करता यावे या हेतुने शरीर‎ रचना शास्त्र विभागाचे डॉ. गजानन मस्के यांना त्यांच्या‎ तीनही मुली समक्ष सुपूर्द करण्यात आला. देहदान समिती‎ मागील २० वर्षांपासून हे कार्य करीत आहे.

आज पर्यंत १३‎ देहदान व दोन नेत्रदान समितीच्या मार्फत करण्यात आले‎ आहे. शिक्षक प्रभाकर नालमवार यांच्या पश्चात पत्नी,‎ ३ मुली अर्चना लींगावार, आरती आनंद गादेवार, डॉ.‎ प्रिती राजेश रुद्रवार व नातवंड आहे. देह देते वेळी देहदान‎ समितीच्या जिल्हा अध्यक्ष समीना शेख यांच्यासह‎ समितीचे तालुका अध्यक्ष अरविंद सरोदे, सचिव हाजी‎ खालीक शेख त्यांचे जावाई व नातेवाईक वसंतराव नाईक‎ वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...