आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:विद्युत रोहित्र बिघडल्याने देवगाव येथे आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव ; गावकऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ, महावितरण उपअभियंत्यांचा “नो रिस्पॉन्स”

जवळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील देवगाव येथील विद्युत रोहित्र बिघडल्यामुळे आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु असून, गावकऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. आठ दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उप अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उपअभियंत्यांकडून “नो रिस्पॉन्स” मिळाल्याचेही गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

गावकऱ्याची हक्काची डीपी गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्यामुळे गावातील शाळेनजीक असलेल्या शेतकऱ्यांच्या डीपीवरून गावातील वीजपुरवठा होत आहे. या डीपींचा ट्रांसफार्मर ६३ चा असल्यामुळे एवढा मोठा विद्युत भार सहन करू शकत नाही . त्यामुळे टाकलेला प्रत्येक ट्रांसफार्मर पंधरा ते वीस दिवसांतच निकामी होत आहे. आता उन्हाळा असल्यामुळे घरगुती विजेची उपकरणे, फॅन, कूलर, फ्रिज, शेगडी सायंकाळी एकाच वेळी सुरु होत असल्याने या डीपीवर प्रचंड ताण येऊन व गावातील वीज वाहिनीचे तार अत्यंत जीर्ण झाले आहे.

ते एकमेकांना चिटकून गावात सायंकाळच्या वेळेला जोरात शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो, रात्रभर गाव अंधारात राहते, गावातील व शेतातील वीजपुरवठा एकाच डीपीवरून होत असल्यामुळे डीपीवर ताण येऊन गावातील व शेतातील वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. वीज नेहमीच कमी किंवा अचानक वाढल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान होत आहे असे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आठ दिवसांपासून खंडित असलेल्या वीजपुरवठ्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, गावातील विजेची समस्या लवकरात लवकर सोडवून वीजपुरवठा नियमित सुरु करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...