आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:वणी ठाणेदारपदी प्रदीप शिरस्कर

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या आहे. अश्यात तत्कालीन एलसीबी प्रमुख तथा शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची वणी ठाणेदार म्हणून वर्णी लागली आहे. तर मुंबई, नागपुरातील तीन अधिकाऱ्यांची यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री होणार आहे.वणी शहरात घरफोडी, दुकानफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे. शहरात अज्ञात चोरट्याने काही दिवसापूर्वी एकाच रात्री जवळपास दहा दुकाने फोडली.

त्यामुळे शहरात परत चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. मधात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवल्याने चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात अंकुश लागला होता. परंतु आता पोलिसांनी ढील दिल्याने चोरटे परत सक्रिय झाले आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले होते.गेल्या काही महिन्यापासून वणी ठाण्याचा प्रभार एका महिला अधिकाऱ्यांकडे होता.

बातम्या आणखी आहेत...