आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘प्रज्ञा जागृती’ने जाणून घेतात दृष्टिहीनांचे जगणे; वर्ध्यातील वर्षा राठोड देताहेत मिडब्रेशन अॅक्टिव्हेशनचे धडे

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धावपळीच्या जीवनात आनंद कसा व्यक्त करावा हे दृष्टिहीन व्यक्तींकडून अनुभवास येत आहे. त्यांचे जगणे, वावरणे, कला कशा पद्धतीने ते हाताळतात यासाठी (मिडब्रेशन अॅक्टिव्हेशन) प्रज्ञा जागृती अभ्यासक्रमाने दृष्टीहीनांचे जगणे शिकवण्याचे धडे वर्ध्यात चिमुकल्यांना देण्यात येत आहेत.

आकाशात उड्डाण घेणारे पक्षी, लांब अंतरावर ठेवण्यात आलेल्या वस्तू अचूकपणे अनेकांना दिसून येतात. ज्या व्यक्तींना दृष्टी दिली आहे अशांना कुठेही रोजगार उपलब्ध होतो. मात्र दृष्टिहीन व्यक्तींना कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध होत नसल्याने त्यांना रेल्वे किंवा बस स्थानकावर छोटा व्यवसाय करावा लागतो. घटनेचा आभास, ऐकण्याची क्षमता, नोटांचा रंग, नाणी ओळखण्याची किमया अशा अनेक कला त्यांनी अवगत केल्या आहेत. त्या माध्यमातून पोटाची भूक भागवत असल्याचे चित्र दिसत आहे. दृष्टिहीन असलेल्या अनेक व्यक्तींची सर्वसाधारण व्यक्तींकडून चक्क फसवणूक होत असल्याची वार्ता ऐकायला मिळत आहे. अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, मात्र दृष्टिहीन व्यक्ती कशा पद्धतीने यावर मात करतो, असे शिक्षण दृष्टिहीन नसलेल्या व्यक्तींना दिले जात नाही. दृष्टिहीन व्यक्तींचे जगणे कसे असते, यासाठी वर्ध्यातील लक्ष्मी नगर येथील वर्षा राठोड या महिलेने (मिडब्रेशन अॅक्टिव्हेशन) प्रज्ञा जागृती या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले आणि स्वतःच्या मुलांना त्याचे धडे देणे सुरू केले आहे. त्यांच्या मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधून रंगाची ओळख, घरात ठेवण्यात आलेल्या वस्तू, घरात लपलेल्या व्यक्तींना शोधून काढणे अशा प्रकाराचे शिक्षण दिले जात आहे.

कपाळाच्या मध्यभागी असलेला ज्ञानाचा तिसरा डोळा या प्रज्ञा जागृती दरम्यान उघडला जातो आणि त्यामुळे शरीरातील बलस्थाने व कल्पनाशक्तीचा जास्तीत जास्त वापर होऊन डोळे बंद असतानाही सर्व दिसायला लागते. या दोन चिमुकल्या मुलांचे गुण अवगत करत अनेक चिमुकले मुले-मुली मिडब्रेशन अॅक्टिव्हेशन प्रज्ञा जागृती अभ्यासक्रमाचे शिक्षण वर्षा राठोड या महिलेकडून घेत आहेत.

अभ्यासक्रमात रंग, व्यक्ती ओळखायला शिकलो
आधी डोळ्यावर पट्टी बांधतात. त्यानंतर रंगाचा सुगंध घेऊन रंग ओळखायला लावतात. लपलेल्या व्यक्तींना ओळखणे शिकलो. या अभ्यासक्रमात आनंद मिळतो.
हार्दिक बोंबले, म्हसाळा, वर्धा.

बातम्या आणखी आहेत...