आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रमांची माहिती:विवेकानंद विद्यालयात हरित सेनेचे प्रकृती वंदन

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विशुद्ध विद्यालयद्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात शनिवारी प्रकृती वंदन कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संरक्षण गती विधीच्या वतीने तसेच राष्ट्रीय हरित सेनेच्या सहयोगाने झालेल्या या कार्यक्रमात मंचावर पर्यावरण संरक्षण गतिविधीचे जिल्हा संयोजक संतोष भोयर, ज्येष्ठ समाजसेवी सुधा अनिल पटेल, संस्कृती संवर्धक मंडळाचे सहसचिव प्रवीण बंडेवार, संकल्प डाखोरे, अश्विन सव्वालाखे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी उपस्थित होत्या.

प्रारंभी संतोष भोयर यांनी पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत पेड, पाणी, पॉलिथिन या विषयात सुरू असलेल्या जाणीव जागृतीसह विविध उपक्रमांची माहिती दिली. विवेकानंद विद्यालयात राबवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मातीच्या गणपती कार्यशाळेबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुधा पटेल म्हणाल्या, सगळं जग आज पर्यावरणविषयक समस्यांनी त्रस्त आहे. माणसाने आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रकृतीचे शोषण केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. त्यामुळे पाणी वाचवणे, वीज वाचवणे, झाडांची निगा राखणे, जमिनीचा पोत टिकवणे असे अनेक उपाय करणे गरजेचे आहे. विजेचा वाढता वापर पाहता ती अनावश्यक जळू नये याकरिताही बचतीचे उपाय केले पाहिजे. वृक्षतोड थांबवून नदीच्या काठाने झाड लावली तर मातीचेही संरक्षण होईल आणि पुराच्या समस्यांपासून आपली सुटका होईल. यानंतर वृक्ष पूजन करून वृक्षाची आरती करण्यात आली. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश सिंह गहरवार यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...