आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षांत निवडणूक रणधुमाळी,:15 बाजार समितींच्या निवडणुकीची तयारी ; ​​​​​​​ डिसेंबरला होणार मतदार यादी प्रसिद्ध

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १५ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात प्रामुख्याने दि. ७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, नवीन वर्षांत २९ जानेवारीला मतदान होणार आहे. आणि ३० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सहकार विभागाने निवडणुकीवरील निर्बंध शिथिल केले होते. तद्नंतर जिल्ह्यातील बहुतांश सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका आटोपल्या. तर काही सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित होत्या, आता बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार उमरखेड तसेच पांढरकवडा बाजार समिती वगळता उर्वरीत १५ बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दारव्हा, बोरी, पुसद वणी, मारेगाव, दिग्रस, आर्णी, महगाव, यवतमाळ, झरीजामणी तसेच घाटंजी या बाजार समितीचा समावेश आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने दि. २९ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधकांनी सहकारी संस्थांना सदस्य सूची मागणार आहे. तर दि. ३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असूनू, दि. ७ डिसेंबरला मतदार यादी अंतिम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...