आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी नगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे याकरता नगरपालिकेच्या एकूण १८ शाळांमध्ये डिजिटल ई लर्निंग सुविधा सुरू करण्याचा व एक पूर्ण इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
त्यासाठी प्रत्येक शाळेला पाच लाख रुपये असे एक कोटी रुपयांची शाळेच्या विकासाकरिता तरतूद सुद्धा केली आहे. त्याबद्दल मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचा महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ शाखा यवतमाळच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय चुनारकर, अमरावती विभाग उपाध्यक्ष डॉ. विनोद डवले, अध्यक्ष धर्मा पवार, सरचिटणीस राजू कुडमेथे, संघाचे सदस्य केंद्र समन्वयक विलास काळे, महिला आघाडी प्रमुख रेखा वरकडे, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सावळकर, जिल्हा प्रतिनिधी आतिफ बेग, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, युसुफ खान, सहकोषाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, सहसचिव शाकीर असलम, संघटक असरार खान, प्रसिद्धी प्रमुख मनोहर भिसे, भारत चव्हाण, अनिल चुटे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.