आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण‎:मित्र क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेचे‎ मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण‎

राळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने‎ विदर्भस्तरिय कबड्डीचे खुले सामने आयोजित‎ करण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी‎ राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या‎ प्रमाणावर नागरीक उपस्थित होते या स्पर्धेचे प्रमुख‎ मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे नेते अरविंद वाढोनकर‎ असल्याने स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण‎ काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

या‎ स्पर्धेत प्रथम क्रमांक सुभाष क्रीडा मंडळ वडगाव,‎ द्वितीय क्रमांक जय हिंद क्रीडा मंडळ, तृतीय‎ पुरस्कार न्यू धरती क्रीडा मंडळ यांना प्राप्त झाले. या‎ स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी महिला काँग्रेस कमिटीच्या‎ अध्यक्ष संध्या सव्वालाखे ह्या होत्या. या बक्षीस‎ वितरण समारंभात माणिकराव ठाकरे, वसंतराव‎ पुरके, प्रफुल्ल मानकर, बाळासाहेब मांगुळकर,‎ अरूण राऊत, प्रविण देशमुख, मनिष पाटील सह‎ अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.‎ ‎

बातम्या आणखी आहेत...