आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ स्पर्धेत अन्न तंत्रज्ञान:आंतर महाविद्यालयीन खेळ स्पर्धेत अन्न तंत्रज्ञान महा.च्या विद्यार्थ्यांचे प्रावीण्य

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत, आंतर महाविद्यालयीन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये कुस्ती स्पर्धा, कराटे स्पर्धा, तायक्वांदो स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन अकोला कृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांत करण्यात आले. कुस्ती स्पर्धेमध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथील द्वितीय सत्राचे विद्यार्थी पालाश वासेकर यांनी फ्री स्टाईल प्रकारात ९७ किलो पुरुष वजन गटात तर सत्यम नागरगोजे यांनी ग्रीको रोमन ९७ किलो पुरुष वजन गटात दोघांनी प्रथम स्थान प्राप्त केले.

सदर महाविद्यालय नवीन असल्यामुळे खेळाच्या पुरेश्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत याही परिस्थितीत कराटे या खेळामध्ये प्रथम सत्र चा विध्यार्थी चेतन अनिल धोटे, ८४ किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. व सत्र द्वितीय सत्रातील विध्यार्थी सत्यम शशिकांत नागरगोजे, ८४ किलो वरील वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. तसेच मुलींमधून सत्र चार ची विध्यार्थीनी अंजली गेडाम, ६८ किलो अधिक वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. व आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत मध्ये ८४ किलो वजन गटात द्वितीय सत्रातील विध्यार्थी सत्यम शशिकांत नागरगोजे याने प्रथम स्थान प्राप्त करून आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सलग तीन खेळामध्ये प्रथम स्थान पटकावून महाविद्यालयास विजयाचा बहुमान प्राप्त करून दिला. तसेच फुटबॉल या खेळामध्ये सत्र चार चा विध्यार्थी मिर्झा अनस याची आंतर महाविद्यालयीन स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.

सदर विद्यार्थी आंतर विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धा, कराटे स्पर्धा, तायक्वांदो स्पर्धेकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे नेतृत्व करणार आहेत. प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील विद्यापीठ स्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयश्री उघाडे व शारीरिक शिक्षण क्रीडा मार्गदर्शक आनंद भुसारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...