आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ प्रजासत्ताक दिन:ईश्वर देशमुख विद्यालयात कार्यक्रम उत्साहात‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम विद्यालयामध्ये‎ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात‎ आला. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य‎ रणजित तिजारे यांच्या हस्ते पूजन व झेंडावंदन‎ करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी‎ देण्यात आली.‎ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी‎ राज्यमंत्री संजय देशमुख तर प्रमुख अतिथी‎ म्हणून फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रणजित तिजारे‎ यांनी आपले स्थान स्वीकारले. व्यासपीठावर‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक शनोज कुमार व्ही के‎ उपस्थित होते. तद्नंतर वेशभूषा स्पर्धा आयोजित‎ करण्यात आली.‎

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व‎ प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी आपले‎ मनोगत व्यक्त केले.‎ याप्रसंगी देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी सादर‎ केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे‎ उद्घाटन करण्यात आले. क्रीडा सप्ताहाचा‎ पहिला दिवस क्रिकेट या खेळाने गाजला.‎ विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी मुख्याध्यापकांनी व‎ सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...