आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळात सामाजिक संस्थांनी विविध कामांमधून संस्थेची व शहराची ओळख निर्माण केली आहे. यवतमाळातील हे सेवामूल्य महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचले पाहिजे. त्यातून चांगली माणसे व काम पुढे येईल आणि समाजात मोठा बदल घडेल, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केले. सेवाव्रती सुरेश राठी यांच्या एकसष्टी पदार्पण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. उमरी पठार येथील संत दोलाराम महाराज वृद्धाश्रमाचे अध्यक्ष, नंदादीप फाउंडेशन, प्रश्नचिन्ह, वंदन सेवा समिती, सेवा समर्पण समिती, मोक्षधाम सेवा समिती, प्रयासवन आदी सेवाभावी संस्थाचे पालक सदस्य तथा आर के एजन्सीचे संचालक सुरेश राठी यांच्या ६१ व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांच्याशी जुळलेले मित्रांनी आयोजित केलेल्या या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी किशोर दर्डा होते.
यावेळी किरण सुरेश राठी उपस्थित प्रमुख अतिथी होत्या. डॉ. कोल्हे म्हणाले की, अनेक स्वयंसेवी संघटनांच्या कामकाजाला दिशा देण्याचे आणि त्यांना ऊर्जा देण्याचे काम सुरेशभाऊंनी केले आहे. यामुळे सर्व संघटनांचे एकच नाथ ते म्हणजे सुरेशनाथ, असे गौरव उद्गार दर्डा यांनी काढले. यावेळी प्रयास सेवांकूर संस्था अमरावतीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी, माहेश्वरी समाजाच्या वतीने सुशील कोठारी, केमिस्ट अँड ड्रगिस्टचे सचिव संजय पिंपळखुटे, प्रयास संस्थेचे सचिव मंगेश खुणे, मोक्षधाम सेवा समितीचे सचिव गणेश गुप्ता, आम्ही यवतमाळकर ग्रुपचे प्रमुख डॉ. प्रशांत चक्करवार, सेवाभावी संस्थांचे समन्वयक प्रा. घनश्याम दरणे, कृतार्थ संस्थेचे संस्थापक प्रशांत बनगिनवार, सुरेश राठी यांच्या भावसून वर्षा राठी, बहीण रेखा चांडक, व्यवसायातील भागीदार मित्र महेश करवा, किरण सुरेश राठी, सुरेखा बंग, स्नुषा नीलम राठी, मुलगा आशिष राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.