आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांच्या सांघिक प्रयत्नांची गरज आहे. त्याशिवाय निसर्गाचे ऋतुचक्र पूर्वपदावर येणार नाही. पर्यावरणाच्या ऱ्हासाने संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे. या संदर्भात वैश्विक पातळीवर भयावह वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांना सांघिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. असे प्रतिपादन पर्यावरण संरक्षण कार्यशाळेला उपस्थित पर्यावरण तज्ञांनी केले.
प्रारंभी कार्यशाळेच्या संयोजक या नात्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून झिरो गार्बेज होम अँन्ड झिरो गार्बेज ही संकल्पना मांडली. त्या अंतर्गत केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, कचरा वर्गीकरण केल्यानंतर प्रत्येक घरी एका खड्ड्यात ओल्या व कुजक्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करावी. हे खत परसबागेतील फुलझाडे व इतर वृक्षांना देता येईल. अधिकचे खत न. प. प्रशासन विकत घेऊन गरजूंपर्यंत पोहचवेल. तर टाकाऊ सुखा कचरा न.प. ने नेमलेल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत व मागास महिलांना ३० रुपये मासिक वर्गणीसह द्यावा. ज्यातून त्यांना रोजगार मिळेल.
वृक्षलागवड करतानाच मोठ्या प्रमाणावर वृक्षवल्ली वाढविण्यासाठी सीडबॉल पध्द्तीचा अवलंब केला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने कचरा वर्गीकरण करुन घंटा गाडीतच दिला पाहिजे. जल स्त्रोत सरंक्षणावर भर देताना विहिरीत व सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या लहान मोठ्या नाल्यांची स्वच्छता राखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न झाले पाहिजेत. असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने एनजीओ प्रयास, संकल्प फाऊंडेशन, प्रतिसाद, बी काइंड, कोब्रा एडव्हेंचर ॲन्ड नेचर क्लब, लिटील पॉज, ओलावा, एमएच २९ हेल्पिंग हॅंड, पी. डी. आर. एस. पॉवर, नंदादीप फाउंडेशन, ईको लव्हर्स, फ्रायडे फॉर फ्युचर, वाइल्ड लाईफ फाउंडेशन, निस्वार्थ, माजी सैनिक संघटना, एक हात मदतीचा, गो ग्रे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचलन देशपांडे तर आभार सुनिल वासनिक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंतराव चिंतावार, पर्यावरण संरक्षण मंडळाचे अश्विन सव्वालाखे, नगर संयोजक संकल्प डांगोरे, उपमुख्याधिकारी ममता राठोड, डॉ. विजय अग्रवाल यांनी अथक परिश्रम घेतले.
वनहक्क व पेसा केंद्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
यवतमाळ
आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे द्वारा युनिसेफ संचालित वन हक्क व पेसाचे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र यांच्या वतीने पर्यावरण दिन हा वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यवतमाळ येथील स्वप्नपूर्ती नगर या ठिकाणी युनिसेक चे अधिकारी व स्थानिक नागरिक यांचे उपस्थितीत वन्य प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक तापमान वाढीमुळे, पूर अवर्षण, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक संकटांना मानवाने स्वतः आमंत्रण दिले आहे. अशा वेळी या सर्व संकटापासून मानवाला स्वतःला वाचायचे असेल तर त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत वन हक्क व पेसा संसाधन केंद्राचे समन्वयक शेख रसूल यांनी यावेळी व्यक्त केले. जागतिक स्तरावर यावर्षी ‘केवळ एक पृथ्वी या संकल्पनेवर आधारित विविध पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
यावेळी पिंपळ, वड, आंबा यांसारख्या वन्य प्रजाती वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेवून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आकाश राऊत यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला संसाधन केंद्राचे समन्वयक रसूल शेख, तितिक्षा डंभे, आकाश राऊत, सुमित भालेराव, ड. वैभव पंडित, अमोल मेश्राम, सय्यद मोहसीन, डेव्हिड शिवणकर, बाबाराव आत्राम, आकाश टेकाम तर स्वप्नपुर्ती नगरातील निलध्वज कांबळे, अनिल वासनिक, सुमेध ठमके, प्रा. नगराळे, प्रा. थुल, अरविंद बोरकर, रूपाली कांबळे, सुनील घोडदौड, माधुरी ठमके, कल्पना गजभिये, रिया मेश्राम, प्रा. श्रद्धा धवणे, सुनीता थुल आदी उपस्थित होते.
पिंपरी येथे जागतिक पर्यावरण दिन
पांढरकवडा
पिंपरी येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय कोंघारा अंतर्गत ‘ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम मार्फत जागतिक पर्यावरण दिन जोमात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच अमिता आत्राम व प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अक्षय कौरवार, ग्रामसेवक संजय सलाम, पोलीस पाटील, राणी खांडरे, कृषीमित्र दुर्गा लांडे, संतोष ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण रक्षणाद्दल विविध उपक्रम राबवत वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालय कोंघारा” येथील चतुर्थ वर्षाच्या कृषी कन्या नेहा काकडे, समीक्षा महाकाले, सुचिता गेडाम, लीना खडसे, भोमेश्वरी घरजले, कोमल राठोड, टिना सातपुते, भाग्यश्री रामटेके, सुप्रिया वऱ्हाडे, पल्लवी मत्ते यांनी केले. कार्यक्रमाचे नियमन करण्यासाठी कृषी महाविद्यालय कोंघारा येथील रावे प्रमुख प्रा.संकेत येलोर, प्रभारी प्राचार्य हेमंत वानखेडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. काजल माने व प्रा. उत्कर्षा स. ढेमरे यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमास शेतकरी बांधव व गावातील जास्तीत जास्त नागरिकांचा प्रतिसाद मिळाला व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.