आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाडगाव रेल्वे गेट ते इच्छापूर सेक्शन-२ या पीक्यूसी सिमेंट रोडचे काम निकृष्ट झाले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तक्रार केली आहे. मात्र, अजूनही दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून त्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन केले.
पीक्यूसी सिमेंट रोडचे काम करताना अंदाजपत्रकाला तिलांजली देण्यात आली. या रस्त्याची दयनीय स्थिती पाहता कामाची गुणवत्ता किती निकृष्ट आहे, हे समोर येते. पीक्युसी सिमेंट रोडचे खड्डे एक वर्षापासून बुजवण्यात आलेले नाही. रस्त्याच्या भेगांमध्ये डांबर भरले आहे.
रोडच्या दुरूस्त केलेल्या पॅनलची दयनीय अवस्था आहे. बहुतांश ठिकाणी स्टील व सिमेंट वाहून जाऊन गिट्टी उघडी पडली आहे. दोन पॅचमध्ये लेव्हल अप-डाउन आहे. तर कुठे पॅचमध्ये दोन-तीन इंचाचा गॅप पडला आहे. अशा बाबी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ.सोनवणे यांनी छायाचित्रांच्या पुराव्यानिशी मांडल्या आहेत. तरीही मक्तेदाराला पाठीशी घालणे सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. या निषेधार्थ त्यांनी नाडगाव रेल्वे गेट ते इच्छापूर सेक्शन-२ या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.