आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पुसद येथे मोदी सरकारच्या नीती विरोधात आंदोलन

पुसद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे दि. ५ ऑगस्टला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी रस्ता रोको करून राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आले. मोदी नितीच्या विरोधात प्रदर्शन कार्यांनी नारेबाजी केली. महागाई बेरोजगारी, अग्निपथ योजनेसह जीवनावश्यक वस्तुवरील वाढलेली जीएसटी विरोधात पुसद काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामध्ये तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय पुरोहित, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज़िया शेख, अमजद खान बिल्डर यांचे मार्गदर्शनात रास्तारोको आंदोलन करण्यात आला. आंदोलनाला संबोधित करतांना डॉ.नदीम यानी केंद्र सरकारवर कडाडून टिका केली. ते म्हणाले की गरीब आणि सर्वसाधारण नागरिकांच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लाऊन महागाई वाढवली आहे. देशातील युवक,शेतकरी, कामगार व सर्व सामान्य नागरिक, व्यापारी इत्यादी घटक, बेरोजगारी व महागाईमुळे त्रस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...