आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शिवसेना पदाधिकाऱ्यांचे दत्त चौकात आंदोलन

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने आकासपूर्ण कारवाई केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शहरातील दत्त चौक येथे सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे म्हणाले की, ईडी सारख्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासदार राऊत हे शिवसेनेचा बुलंद आवाज आहे. त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून ही कारवाई सुडबुद्धीने केली जात आहे. राऊत हे पक्षाचा आवाज बुलंद करतात म्हणून त्यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. राजेंद्र गायकवाड यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध नोंदवला. संतोष ढवळे ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा ह्यांच्यावर तिखट शब्दात एकच हल्ला चढवला. जनता ह्या सर्व कारस्थानाचा वचपा मत पेटीतून काढील असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा, तालुका युवा अधिकारी पवन शेंद्रे, व्यापारी आघाडी जिल्हा संघटक प्रवीण निमोदीया, शेतकरी सेनेचे अशोक पुरी, शहर प्रमुख नीलेश बेलोकर, शहर प्रमुख योगेश भांदक्कर, शहर प्रमुख अतुल गुल्हाने, शहर संघटक चेतन शिरसाठ, शहर समन्वयक तुषार देशमुख, जिल्हा संघटिका निर्मला विनकरे, शहर संघ टिका कल्पना दरवाई, युवा सेना जिल्हा समन्वयक अमोल धोपेकर, युवसेना उपजिल्हा युवा अधिकारी गिरीजानंद कळंबे, व्यापारी आघाडी उपजिल्हा प्रमुख सुजित मुनगिनवार, उपतालुका प्रमुख चंद्रकांत उडाखे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रुपेश सावरकर, युवासेना जिल्हा चिटणीस श्रीकांत मीरासे, आदिवासी आघाडी प्रमुख वसंत कंगाले, गार्गी गिरडकर यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...