आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ३ जानेवारी रोजी दाते कॉलेज चौकात भाजपचे आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत अजित पवार यांचा तीव्र निषेध केला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून मंगळवारी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
अजित पवार यांचे वक्तव्य निंदनीय आहे . यावेळी शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा, आध्यात्मिक आघाडीचे शंतनु शेटे,ज्ञानेश्वर सुरजुसे, दीपक शिरभाते, रोहित राठोड, शुभम सरकाळे, योगेश पाटील, अभिषेक श्रीवास, सुरज विश्वकर्मा, सुरज जैन, राहुल मेहत्रे, हर्षल मेकरतवार, योगेश चव्हाण, बंटी गुप्ता जिल्हा सचिव सचिन नागरगोजे, दुर्गेश मेंढे, प्रकाश राठोड, अश्विन बोपचे, शुभम चोरमले, विशाल बावणे, सर्वेश नावाडे, अंकित कुठे, श्याम ठाकरे, ओम जयस्वाल, हर्षल भांडेकर, प्रज्वल गिरवळकर, शुभम लांडे, श्रीकांत बावणे, प्रत्युष मिसाळ, आकाश राऊत, शुभम जुनघरे, अरविंद राऊत, प्रतीक गुप्ता, आकाश जाधव, मयूर जाधव, ऋतिक जानकर, सुमित झाडे, सचिन मुनेश्वर, भावेश बिजवे, विक्रम कदम, शुभम पतंगे, अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.