आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कळसकर यांनी कर्तव्य बजावणाऱ्या शिपायास मारहाण केली. या घटनेचा शुक्रवार, दि. २५ मार्च रोजी यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, लिपीक वर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदवला. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कळसकर यांनी कर्तव्य बजावणाऱ्या नारायण उईके यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा यवतमाळ जिल्हा चतुर्थ श्रेणी संघटनेच्या वतीने शुक्रवार, दि. २५ मार्च रोजी काळ्याफिती लावून निषेध नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून प्रकरणाची चौकशी प्रस्तावित करावी, या प्रकरणात योग्य कार्यवाही झाली नाही, तर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुडमेथे, सुरेश चव्हाण, संजय गावंडे, सचिन बिदरकर, ताराचंद देवधरे, तेजस तिवारी, सचिन पानोडे, अंकित चंदनखेडे, शिल्पा मेश्राम, भानुदास चरडे यांच्यासह इतर लिपिकवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.