आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखू विरोधी दिन:राळेगावच्या न्यू इंग्लिश हायस्कूलतर्फे  जागतिक तंबाखूविरोधी दिनी जनजागृती

राळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन मंगळवार, दि. ३१ मे रोजी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील एनसीसी विद्यार्थ्यांना तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच राळेगाव शहरातून एनसीसी विद्यार्थ्यांनी रॅली काढून, घोषणा देऊन लोकांना तंबाखूच्या दुष्परिणाम बाबतीत जागृत करण्यात आले. यावेळी एनसीसी अधिकारी सुरेश कोवे व न्यू इंग्लिश हायस्कूलचे उपमुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, अरुण कामनापुरे तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...