आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त यवतमाळ येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबीलकर यांनी पत्रकारांसमोर खास चमत्कारिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. समाजातील काही भोंदू बाबा लोकांना अशा प्रकारचे प्रयोग दाखवून दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करतात आणि भोळे भाबडे लोक खरं समजून त्यांच्या जाळ्यात फसतात. नंतर मात्र हेच भोंदूबाबा त्यांची आर्थिक फसवणूक करतात. शारीरिक शोषण करतात. असं होऊ नये म्हणून महाराष्ट्र अंनिसतर्फे चमत्कारिक प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी प्रकाश आंबीलकर यांनी पाणी टाकून दिवा पेटवणे, पाण्याचा फवारा मारून होम पेटवून दाखवणे, नारळातून वस्तू काढून दाखवणे, अनुकूचीदार लोखंडी खिळ्यांवर झोपून दाखवणे, असे विविध प्रयोग करीत, त्यामागील वैज्ञानिक सत्य सुद्धा सांगितले. कुठे हात चलाखी तर कुठे विविध रसायनांचा वापर करून हे प्रयोग केले जातात. हे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. असे प्रयोग करणाऱ्या भोंदू बाबांपासून आपण सावध राहावे आणि समाजालाही सावध करावे असे आवाहनही आंबीलकर यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.